जोराच्या वाऱ्यामुळे आंबोलीतील जानू वरक यांच्या घराचे छप्पर कोसळले

राजन तेलीं कडून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याची ग्वाही;भाजपा धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पाटील यांची माहीती

*⚡आंबोली ता.१६-:* : आंबोलीत दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या जोराच्या वाऱ्याने जानू पदू वरक यांच्या घराचे छप्पर उडून गेल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान असून पावसाळ्याचे दिवस असल्याने राहण्याची त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. दरम्यान, सदर घटनेची माहीती भाजपाचे धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पाटील यांना मिळताच त्यांनी स्थानिक भाजपाचे संतोष पालेकर व आदीसह ‘त्या’ नुकसानग्रस्त घराची पाहणी केली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी चर्चा करत शासना मार्फत तसेच जिल्हा भाजपा तर्फे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

You cannot copy content of this page