निधीची काळजी करू नका,काम दर्जेदार करा

खास विनायक राऊत;नाटळ मल्हारी पुलानजीक जिल्हा नियोजनमधून पर्यायी मार्गाचे केले भूमिपूजन

*⚡कणकवली ता.१६-:* पालकमंत्री उदय सामंत याच्याशी चर्चा करून नाटळ मल्हार नदीवर कायमस्वरूपी मुख्य पूलाच्या कामासाठी 6 कोटी रु. तरतूद करण्यात आली असून हे काम दिवाळी नंतर सुरू होईल. तर तोपर्यंत येथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेवून तात्पुरता पर्यायी मार्ग म्हणून जिल्हा नियोजन मधून 55 लाख रु.पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे.या कामाचे भूमिपूजन झाले असून ठेकेदार रात्रदिवस काम करून हे काम गणेश चतुर्थी आधी पूर्ण करेल असा विश्वास खास.राऊत यांनी बोलताना व्यक्त केला. नाटळ म्हलार नदीवरील म्हलारी पूल कोसळल्याची वस्तुस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व या विभागातील तालुका प्रमुख डॉ. प्रथमेश सावंत तसेच माजी जि.प.सदस्य बाळा भिसे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर नाटळ येथील म्हलारी पुलाच्या तात्पुरत्या पर्यायी मार्गाचे भूमिपूजन खास.विनायक राऊत यांच्या हस्ते व जेष्ठ नागरिक दाजी गावकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी आम.वैभव नाईक,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,संदेश पारकर, अतुल रावराणे,जिल्हाप्रमुख संजय पडते,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव,कार्यकारी अभियंता संजय शेवाळे,जी.प.गटनेते नागेंद्र परब,बाळा भिसे,तालुका प्रमुख प्रथमेश सावंत,शैलेश भोगले,उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,राजू राठोड,अँड हर्षद गावडे,प.स.सदस्य मंगेश सावंत,विभाग प्रमुख आनंद आचरेकर,महेंद्र डीचवलकर, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, संदेश पटेल,रामू विखाळे,ए पी सावंत,बेनी डिसोजा,दादा भोगले,नाटळ सेवा सोसायटी चेअरमन प्रदीप सावंत आदी शिवसेना पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते. खास. राऊत पुढे म्हणाले, शिवसेना ही सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर राहिली असून या पुलाचे काम करत असताना अनेक भुते आढवी येतील. या भुतांचा बंदोबस्त येथील केलेल्या गावकऱ्यांच्या गाऱ्हान्याने झालेला आहे.तसेच हे काम करताना निधीची कमतरता भासणार नाही.याची जबाबदारी पालकमंत्र्याच्या वतीने आम्ही घेतो.मात्र हे काम दर्जेदार झाले पाहिजे.यावर आपण ही लक्ष ठेवावे. आम.नाईक म्हणाले,अतिवृष्टीत कोसळलेल्या या पुलाची पहाणी करण्यासाठी स्वतः पालकमंत्री यांनी भेट दिली.यावेळी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्ग म्हणून पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी हे काम करताना काही अडचणी असल्याचे सांगितले. यावर सतीश सावंत व आम्ही लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले.याबद्दल खास राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. सतीश सावंत म्हणाले,पालकमंत्री उदय सामंत,खास .विनायक राऊत,आम.वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व मंत्री एकनाथ शिंदे नाम.अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करत हा दळवळणाचा मोठा प्रश्न सोडविला आहे.तात्पुरता पूल उभारण्यासाठी तात्काळ निधीची तरतूद जिल्हा नियोजन मधून करत निश्चितच न्याय द्यायचे काम केले आहे.यापुढे ही शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे होणार असून श्रेयासाठी कोणी कितीही बॅनरबाजी केली तरी ही विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून होत असल्याचे जनतेला माहीत असल्याचा टोला विरोधकाना लगावत शिवसेना विकासात राजकारण करत नसल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत म्हणाले, पालकमंत्री,खासदार,आमदार व मंत्री यांच्या माध्यमातून हा महत्वाचा प्रश्न सुटत असल्याने येथील जनता ही पुढील काळातही शिवसेनेच्या पाठीशी राहणार असून यापुढच्या काळात ही अशाच प्रकारची साथ मिळले असा विश्वास व्यक्त करताना शिवसेनाच या भागातील विकासाचे प्रश्न सोडविनार असल्याचे त्यांनी सांगत उपस्थिताचे आभार मानले.

You cannot copy content of this page