त्रैमासिक ‘वैभवपर्व’ची उद्घोषणा व मुखपृष्ठ अनावरण संपन्न

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचा उपक्रम

*⚡वैभववाडी ता.१६-:* अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे.आणि त्यातही अभिव्यक्ती ही माणुसकी अग्रणी धरून होणार असेल तर ती देशहितासाठी नेहमीच पोषक ठरत असते.आणि ही अभिव्यक्ती लेखणीच्या माध्यमातून जगासमोर यावी, नवयुवकांना आणि नव्या लिहित्या हातांना एक मंच मिळावा या उद्देशाने वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या विद्यमाने ऑनलाइन डिजिटल ‘ वैभववाडीतील आंबेडकरी चळवळीचा दस्तावेज अर्थात ‘वैभवपर्व’ या त्रैमासिकाची उद्घोषणा करण्यात आली. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ’ पुरस्कृत ‘वैभवपर्व’ या त्रैमासिकाच्या नावाची उद्घोषणा आणि प्रथम अंकांचे मुखपृष्ठ अनावरण ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. मुखपृष्ठ अनावरण वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष व कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष यशवंत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. जि. प.सिंधुदुर्गच्या माजी समाजकल्याण सभापती व विद्यमान सदस्या शारदाताई कांबळे यांनी सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. वै. ता. बौ.सेवा संघ ग्रामीण सरचिटणीस आयु.रवींद्र पवार,वै. ता. बौ.सेवा संघ मुंबई सरचिटणीस आयु.प्रा.डॉ.देवेंद्र जाधव, वै. ता. बौ.सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष आयु.इंजि.संजय जाधव, अभ्यासक विचारवंत बी.एस.जाधव आणि रुचिता कदम यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या. तदप्रसंगी ‘वैभवपर्व’ या त्रैमासिकाचे सन २०२१-२२ या एक वर्षासाठीचे संपादक मंडळ जाहीर करण्यात आले. यात संपादक म्हणून प्रफुल्ल जाधव, कार्यकारी संपादक प्रतिक पवार,सहसंपादक अमित कांबळे आणि अमर कदम,प्रसिद्धी प्रमुख रुपेश कांबळे,वितरण प्रमुख दीपाली जाधव,जाहिरात प्रमुख हितेश भोसले, सल्लागार-साहित्यिक सुनील हेतकर आणि पत्रकार मारुती कांबळे, मांडणी अश्लेषा यादव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.सदर त्रैमासिकाची कॅलिग्राफी चिकित्सक, विचारवंत स्मृतिशेष प्रा. विजय जामसंडेकर यांच्या संकल्पनेतून आलेली असून प्रथम अंकांचे मुखपृष्ठ बुद्धभूषण साळवे,नाशिक यांनी तयार केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक प्रफुल्ल जाधव यांनी तर सूत्रसंचालन प्रतिक पवार यांनी केले.तांत्रिक सहाय्य श्रावणी कोरडे यांनी केले. रुपेश कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page