मटका पावती पुस्तक आणि रोख रु. 9 हजार 470 जप्त
*⚡कणकवली ता.१४-:* कणकवली एसटी बस स्टँड परिसरात मटका घेणाऱ्या नरेंद्र रामचंद्र सावंत ( वय 51, रा.परबवाडी, कणकवली ) याला एलसीबीच्या पथकाने दणका दिला असून त्याच्या ताब्यातील मटका पावती पुस्तक आणि रोख रु. 9 हजार 470 जप्त केले आहेत. ही कारवाई एलसीबी उपनिरीक्षक एस. एच देसाई, एपीएसआय आर. बी. शेळके, हवालदार कृष्णा केसरकर, पोलीस नाईक संकेत खाडये, कॉन्स्टेबल इंगळे यांच्या पथकाने दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी केली. याबाबत पोलीस नाईक संकेत खाडये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नरेंद्र रामचंद्र सावंत याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
