स.का. पाटील हे केवळ कोकणचे नव्हे तर सर्व युवकांसाठी प्रेरणास्थानी

सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांचे प्रतिपादन

*⚡मालवण ता.१४-:* मुंबईचे महापौर असणाऱ्या स्व. स. का. पाटील यांनी त्या काळात मुंबईवर राज केल्याने ते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जात होते. कुडाळ पाट गावातून सुरु झालेला स. का. पाटील यांचा प्रवास हा त्यांच्या कार्यामुळे केंद्रीय मंत्री पदापर्यंत झाला. आज अनेक ठिकाणी त्यांच्या नावाच्या शैक्षणिक संस्था असून स. का. पाटील हे केवळ कोकणचे नव्हे तर सर्व युवकांसाठी प्रेरणास्थानी आहेत असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कै. स का. पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी स का पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पाटील यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्रा. एच एम चौगुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी स. का. पाटील यांच्या कोकणातून चालू झालेल्या प्रवासापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत झालेल्या प्रगती मधून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले पासून त्याची पार्श्वभूमी आणि आणि त्यांचे योगदान स्पष्ट केले. शेवटी प्रा. बी. एच. चौगुले यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच काही विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

You cannot copy content of this page