श्रावणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांची व भाजी पाल्याची आवक वाढली

फळांच्या किंमतीत वाढ तर भाजी पाल्याच्या दरात चढ-उतार

*⚡सावंतवाडी ता.११-:* श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांची व भाजी पाल्याची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळांची आवक वाढली आहे. फळांच्या किंमतीत वाढ झाली असून भाजी पाल्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारपासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली असून बाजारात सफरचंद, डाळींब, चिक्कू, केळी, पेरू आदी फळांची रेलचेल वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सफरचंदाची आवक वाढली आहे. सफरचंदाचे दर १०० पासून २०० रुपये किलोपर्यंत राहिले आहेत. तर भाजी पाल्यात कोबी, टोमॅटो, ढब्बू, गवार, भेंडी, कारली आदींची आवक वाढली आहे. भाजी पाल्याच्या दरात कधी ६० रुपये तर कधी ४० रुपये किलो असा चढ-उतार दिसून येत आहे. श्रावण महिन्यात विविध सण तसेच श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार आदी येत असल्याने फळांच्या दरात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page