सावंतवाडीकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीदेव पाटेकर मंदिरात श्रावणी सोमवार

राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्याहस्ते विधिवत पूजा

*⚡सावंतवाडी ता.०९- :* श्रावण मासाला आजपासून सुरूवात झाली असून आज पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने ४०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सावंतवाडीकरांच श्रद्धास्थान असणाऱ्या संस्थानकालीन श्री देव पाटेकराच मंदिरात कोरोना नियमावलीचे पालन करून श्रावणी सोमवार साजरा करण्यात आला. दरम्यान, आज पहाटेच राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते श्री देव पाटेकरची विधिवत पूजा करण्यात आली.. यावेळी युवराज लखमराजे भोसले, श्रद्धाराजे भोसले आदी उपस्थित होते. तर कोविडच हे संकट दुर होऊदे अस साकडं यावेळी घालण्यात आल. दरवर्षी श्रावणी सोमवारनिमित्त श्री देव पाटेकराच दर्शन घेण्यासाठी सावंतवाडीसह गोवा, कर्नाटक इथून भाविक येत असत, मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पाटेकर देवस्थान दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असल्याने भाविकांनी देव पाटेकराच दर्शन बाहेरूनच घेतल.‌

You cannot copy content of this page