आम. केसरकर यांनी २० दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबियांना केले जीवनपयोगी वस्तू वाटप

एक हात छोट्याशा मदतीचा..

*⚡सावंतवाडी ता.०९-:* एक हात मदतीचा या संकल्पनेतून सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी दिव्यांग कुटुंबीयांना जीवनपयोगी साहित्याचे वाटप केले आहे. त्यावेळी सावंतवाडी तालुक्यातील २० दिव्यांग व्यक्तींचा कुटुंबियांना जीवन उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय गांधी निराधार समिती सदस्य श्री गजानन नाटेकर, आरोस सरपंच श्री शंकर नाईक, असनिये सरपंच स्नेहल असनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बिद्रे, श्री संजय गावडे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page