*⚡कणकवली दि.०९-:* केंद्रीय उदयोग मंत्री ना. नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा माजी आम.प्रमोद जठार दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील सर्व दौरा प्रमुखांची राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठक घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना सर्व मंत्र्यांनी जनतेसमोर जाऊन जावी आणि आशिर्वाद म्हणुन मंत्र्याच्या दौऱ्याचे नामकरण ‘ जन आशिर्वाद यात्रा ‘ असे नामकरण करण्यात आले आहे.भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा माजी आम.प्रमोद जठार यांच्या सोबत आम. नितेश राणे, आम.सुनिल राणे आम. संजय केळकर , आम. निरंजन डावखरे उपस्थित आहेत
ना. नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठी माजी आम.प्रमोद जठार दिल्लीत
