भाजपचे प्रांतिक सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांचे मानले आभार
*⚡मालवण दि.०८-:* गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेला घुमडे येथील मुख्यरस्त्यापासून स्मशानभूमी पर्यंत जाणाऱ्या पायवाटेचे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यात रूपांतर करण्यात आले असून यासाठी भाजपचे प्रांतिक सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी आर्थिक सहयोग दिल्याने ग्रामस्थांनी श्री सामंत यांना धन्यवाद दिले आहेत घुमडे येथील मुख्यरस्त्यापासून स्मशानभूमी पर्यंत जाणारा रस्ता श्री दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून पूर्ण केला आहे. १२ फूट रुंद आणि सुमारे ५०० ते ७०० मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रीटने करण्यात आला आहे. यापूर्वी त्याठिकाणी पायवाट होती. त्यावर सिमेंट काँक्रीट टाकून रस्त्याची रुंदीही वाढविण्यात आली. शिवाय स्मशानभूमीच्या परिसरातील सुशोभीकरण देखील दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने पूर्ण केले आहे. गावच्या वतीने सरपंच दिलीप बिरमोळे यांनी दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.
