*⚡बांदा दि.०८-:* नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे निगुडे-पाटीलवाडी येथील नागरिकांना पुराचा तडाखा बसला. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह अन्य साहित्य वाहून गेले. त्यामुळे त्यांना काही मदत म्हणून परिवहन मंत्री अॅड. अनिल परब तसेच महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव संतोष धुवाळी यांच्या सहकार्यातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. निगुडे-पाटीलवाडी येथे रघुनाथ नाईक व सचिन राणे यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कडधान्यसह मदतीचा हात दिला. यावेळी मडुरा सर्कल अशोक पवार, निगुडे तलाठी भाग्यशीला शिंदे, शेर्ले कोतवाल विनोद धुरी आदी उपस्थित होते. गरजेच्या काळात महाराष्ट्र परिवहन मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव यांनी केलेली मदत आम्हाला अनमोल आहे, असे उद्गार पूरग्रस्त ग्रामस्थांनी काढले.
निगुडेतील पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
