कलंबिस्त ख्रिश्चनवाडी येथील पूरग्रस्तांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून मदतीचा हात

२२ कुटुंबांना तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तू वाटप

*⚡सावंतवाडी-:* कलंबिस्त ख्रिश्चनवाडी येथील पूरग्रस्तांना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. येथील २२ कुटुंबांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंच वाटप करण्यात आले. हे साहित्य चर्चचे धर्मगुरू आणि तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते देण्यात आले. संकंटात मदतीला धावल्यानं कलंबिस्त ख्रिश्चनवाडी येथील पुरग्रसतांनी राष्ट्रवादीचा सामाजिक सेवेसाठी तसेच पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आरोग्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना केली. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, बावतीस फर्नांडिस,आगस्तिन फर्नांडिस, हिदायतुल्ला खान, संतोष जोईल, इफ्तिकार राजगुरू, अँथोन रॉड्रीक्स कलंबिस्त ख्रिश्चनवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page