कणकवलीतील हॉटेल नीलम कंट्रीसाईडला असाही कोकणात बहुमान

बेस्ट रेस्टॉरंट्स, बेस्ट सर्विस इन कणकवली , बेस्ट टेक वे इन कणकवली अवॉर्ड जाहीर

*⚡कणकवली ता.०७-:* संपूर्ण भारत देशात एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिधुदुर्ग जिल्हयातील हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अग्रणी असलेल्या कणकवलीतील हॉटेल नीलम कंट्रीसाईडला रेस्टॉरंट्स गुरु ‘ या इंटरनॅशनल संस्थेने ‘ बेस्ट रेस्टॉरंट्स . बेस्ट सर्विस इन कणकवली , बेस्ट टेक वे इन कणकवली असे तीन अवॉर्ड जाहीर केले आहेत. या अवॉर्डने सिंधुदुर्ग चा बहुमान झाला असल्याची माहिती हॉटेल नीलम कंट्रीसाईडचे जनरल मॅनेजर प्रसाद कृष्णा यांनी दिली. कणकवली येथील नीलम कंट्री साईड येथे आयोजित पत्रकार परिषदेत नीलम कंट्रीसाईडचे जनरल मॅनेजर प्रसाद कृष्णा बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत सुभाष दळवी, कमलाकर पाटील उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे हे हॉटेल कोकणच्या पर्यटनाचा मानबिंदू ठरत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले प्रसाद कृष्णा म्हणाले,रेस्टॉरंट्स गुरुचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अॅड्यू प्रिस्ट यांनी हा अवॉर्ड देऊन कणकवली -जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईडचा बहुमान केला.हॉटेल नीलम कंट्रीसाईडमध्ये चांगल्या प्रतीचे जेवण , दर्जेदार सुविधा , उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आरामदायी सेवा पाहून हा अवॉर्ड देण्यात आला आहे . असे अवॉर्ड मिळणारे कोकणातील एकमेव हॉटेल ठरले आहे . तसेच मार्चमध्ये इंटरनॅशनल ट्रॅव्हल माईत या संस्थेने ” टॉप थ्रीस्टार हॉटेल इन सिंधुदुर्ग ” व ” टॉप ५० हॉटेल्स विथ जिम इन महाराष्ट्र हा अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे . अत्याधुनिक सोयी सुविधा व उत्कृष्ट लॉजिंग हा अवॉर्ड देण्यात आला. कोरोना पाश्वभूमीवर हॉटेल व्यवसाय व्यवसाय अडचणीत आला असताना नीलम कंट्रीसाईड हॉटेलमध्ये मात्र विविध प्रयोग करत अनेक प्रकारचे पदार्थ बनविण्यात आले. यामध्ये बांबू बिर्याणी हा वेगळा ट्रेंड आणण्यात आला. विविध प्रयोग करण्यात हॉटेल नीलम कंट्रीसाईड यशस्वी ठरले असून याची दखल घेऊन हे अवॉर्ड जाहीर झाले असल्याचे सांगताना प्रसाद कृष्णा म्हणाले, या या हॉटेलमध्ये दररोज जवळपास 150 जन जिमचा लाभ घेत होते असे त्यांनी सांगितले. या सर्व सुविधांचा विचार करूनच हे अवॉर्ड जाहीर झाले असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page