मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेला दिली भेट

नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत

*⚡सावंतवाडी ता.०७-:* मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व सिंधुदुर्गचे सुपुत्र सुहास पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेच्या पाहणी दरम्यान येथील पालिकेला भेट दिली यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे शाल व पुष्पगुछ देऊन स्वागत केले सुरु होणाऱ्या वर्षांपासून उपकेंद्र सुरु करण्याच्या उद्देशाने तात्पुरत्या बिल्डिंगसाठी जिमखाना येथील बाबासाहेब ज्ञानप्रबोधिणी व समाज मंदिर येथील बहुउद्देशीय प्रशिक्षण व सुविधा केंद्र, वाचनालयाची पाहणी केली .

यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अनारोजीन लोबो, दिपाली भालेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी, डॉ. जयेंद्र परुळेकर, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, बंटी पुरोहित नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page