दिगवळेतील प्रमिला जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

राज्य शासनाकडून ४ लाख रुपये मदतीचा धनादेश केला धनादेश सुपूर्द

*⚡कणकवली ता.०६-:* अतिवृष्टीमुळे कणकवली तालुक्यात दिगवळे – रांजणवाडी येथे डोंगर कोसळून डोंगराच्या दरडीखाली अडकून मृत्यू झालेल्या प्रमिला प्रकाश जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रमोद प्रकाश जाधव यांना राज्य शासनाकडून ४ लाख रुपये मदतीचा धनादेश कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याहस्ते वितरण करण्यात आला. नैसर्गिक दुर्घटनेमुळे जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची मदत करण्यात येते. दिगवळे येथील दुर्घटनेत डोंगर खचल्याने डोंगरातील मातीचा भराव खाली येत त्यात गाडल्या गेल्याने प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने प्रमिला जाधव यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली होती. त्यानुसार हा धनादेश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी प्रमिला जाधव यांचा मुलगा प्रमोद यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार उपस्थित होते.

You cannot copy content of this page