प्रथमेश देसाई, रिधी कुसगावकर, प्रसन्न सोनूर्लेकर प्रथम
*⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे यात पंचम खेमराज महाविद्यालय कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून यात सायन्स मधून प्रथमेश देसाई (९३.६७), कॉमर्स मधून रिधी कुसगावकर (८९.८३), आर्ट्स मधून प्रसन्न सोनुर्लेकर (९३.८३) असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भारमल यांनी अभिनंदन केले आहे.
