*⚡कणकवली ता.०३-:* कासार्डे आनंदनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त आदर्श प्राथमिक शिक्षक शंकर धाकटू केतकर गुरूजी ( वय ८१ ) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. केतकर गुरूजी कासार्डे साटमवाडी येथील प्राथमिक शाळेतून उच्च श्रेणी मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. विद्यार्थी प्रिय केतकर गुरूजी त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाचे होते.हरहुन्नरी व दानशूर व्यक्तिमत्व वेळप्रसंगी मदतीला धावून जाणे या गुणांमुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. ते कबड्डी खेळाचे उत्तम खेळाडू म्हणून परिचित होते.याशिवाय त्यांना दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते कासार्डे, तळेरे येथील कॉम्प्युटर रिपिरिंग व्यवसायिक गणेश केतकर तसेच कसालच्या आरोग्य सेविका रत्नप्रभा केतकर-सुर्वे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली,सून,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सेवानिवृत्त आदर्श प्राथ.शिक्षक शंकर केतकर यांचे निधन
