आशा, गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी नोकरी द्या;संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
वैभववाडी प्रतिनिधी राष्ट्रीय आरोग्य अभियान योजना कायम करुन त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दयावा.आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे.यासह विविध मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वैभववाडी शाखेच्यावतीने वैभववाडी नायब तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नम्रता वळंजू, सचिव प्रणाली रावराणे, सुचिता करकोटे, उपाध्यक्ष ममता लिंगायत, सेजल जाधव, साक्षी कांबळे , शर्मिला धावडे, साक्षी शेळके, सुप्रिया सुतार,प्राची पवार, यांच्यासह तालुक्यातील आशा उपस्थित होत्या. सीटू महाराष्ट्र राज्य कमिटीच्या निर्णयानुसार देण्यात आलेल्या या निवेदनात आशाना १८ हजार रुपये तर गटप्रर्वतकांना २१ हजार किमान मासिक वेतन सुरु करावे.तसेच त्यांना ग्रॕच्युईटी, पेन्शन देण्यात यावी.गेल्यावर्षी पासून लागू केलेली आशाना २ हजार व गटप्रर्वतकांना ३हजार रुपये मानधन वाढ नियमित दया.जून २०२१ मध्ये जाहीर केलेल्या आशाना १५०० रुपये व गटप्रर्वतकांना १७०० रु.मानधन वाढ निर्णय शासकीय आदेश त्वरीत काढून जुलै २०२१ पासून देण्यात यावा. तसेच शेतकरी विरोधी तीन कायदे त्वरीत रद्द करण्यात यावे.कामगार विरोधी चार संहिता त्वरीत रद्द करण्यात याव्यात.विदयार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करण्यात यावे.डिझेल , पेट्रोल, स्वयंपाकाचा गॕस व इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई त्वरीत कमी करावी. या मागण्याची पुर्ताता केंद्र व राज्य सरकारने केली नाही.तर भविष्यात तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. फोटो- नायब तहसिलदारांकडे निवेदन सुपूर्द करतांना आशा वर्कर्स. छाया संजय शेळके वैभववाडी
