कणकवली पिळणकरवाडी येथील सत्यम पिळणकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली शहरातील पिळणकरवाडी येथील रहिवासी सत्यम मोहन पिळणकर (40) यांचे आज गोवा बांबुळी येथील हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.त्याच्या अकाली निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे. सत्यम हा उत्तम क्रिकेटपट्टू होता.जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये पटकीदेवी मित्रमंडळाच्या संघातून खेळत असे.तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. रंगकामे व रिक्षाचालवून आपला उदरनिर्वाह करीत असे.त्यांच्या दुःखद निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई, मुलगा, भाऊ,भावजय,पुतण्या असा परिवार आहे.समीर पिळणकर यांचे ते बंधू होत.

You cannot copy content of this page