महसूल दिनाचेचे औचित्य साधत आंबोली मंडळचे सर्कल गुरुनाथ गुरव यांचा सत्कार

*⚡सावंतवाडी ता.०३-:* दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत महसूल विभागात चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला जातो. यावर्षी आंबोली मंडळ चे सर्कल गुरुनाथ गुरव यांचा सत्कार उपविभागीय दंडाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते. गेली ३ वर्ष आंबोली सर्कल मध्ये गुरव यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्याच वर्षी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांनी केलेल्या कामामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page