मनसे उपविभाग अध्यक्ष विष्णू मस्के यांची संकल्पना;दोन्ही बाजूनी उभारल्या शेड:आज झाले लोकार्पण
*⚡कुडाळ ता.०३-: मनसे पिंगुळी उपविभाग अध्यक्ष तथा सर्पमित्र विष्णू मस्के यांच्या संकल्पनेतून आणि सौजन्याने पिंगुळी गुढीवर स्टॉप येथे हायवेच्या दोन्ही बाजूस निवारा शेड उभारण्यात आली आहे. या दोन्ही शेड आज प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, आणि माजी पोलीस पाटील गणपत मस्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शेडचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी शिवदास मस्के, बनी नाडकर्णी, हेमंत जाधव, आनंद ठाकूर, ऋत्विक ठाकूर, अमित मस्के, विठ्ठल मस्के, भास्कर गंगावणे, नयना मस्के, प्रलिषा मस्के, आदिलशहा व ग्रामस्थ उपस्थित होते.
