*⚡कणकवली दि.३१-:* मालवण तालुक्यातील किर्लोस भावेवाडी येथील रहिवासी,सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार कमलाकर उर्फ दिगंबर गोविंद मेस्त्री (वय 61) यांचे नुकतेच निधन झाले. कमलाकर मेस्त्री हे परिसरात बाबू मेस्त्री या नावाने ओळखले जात.सुतार कलेबरोबरच गेली अनेक वर्षे ते गणेशमूर्ती बनवत असत.गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी,जावई, विवाहित बहिणी, चुलत भाऊ असा परिवार आहे.किर्लोस ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या कविता कमलाकर मेस्त्री यांचे ते पती होत.
किर्लोस येथील गणेश मूर्तिकार कमलाकर मेस्त्री यांचे निधन
