गुरू पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी रोटरी क्लबचा हटके कार्यक्रम

अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांची कल्पना

*⚡सावंतवाडी दि.३१-:* गुरु-पोर्णिमा हे समाजातील गुरुना वंदन करण्याचा त्यांच्या प्रती आदर – प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. यंदा रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार याना हटके “गुरु-पोर्णिमा” साजरी करण्याची कल्पना आली. ज्यानी निसर्गाला गुरु मानुन त्याच्याशी नाते जोडले. फुलपाखरात रमले, त्याच्यावर पुस्तक लिहीले. तितकेच प्रेम निसर्गावर आणि वन्यप्राण्यावर केले. तसे शिक्षणानी मॕकेनिकल इंजिनियर असुनही मुळात हॉटेलींग आणि हाॕस्पिटॕलीटीची आवड असणारे हे आंबोलीतील व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.हेमंत ओगले. वडिल MTDC मध्ये असल्याने त्याना मुळात या व्यवसाया बदल आकर्षक होते. आंबोली सारख्या निसर्गाने नटलेल्या परीसराने त्याना भुरळ पाडली आणि त्यानी आंबोली ही कर्मभुमी निवडली. स्वतः बरोबर आंबोलीतील तरुणाना हाताशी धरुन अनेक युवकाना मार्गदर्शन करुन ट्युरिझम आणि त्याच्याशी निगडित वन्यजीव मार्गदर्शक निर्माण केले. दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंतांचे सत्कार गुरु-पोर्णिमेला केला जातो. यामध्ये सामाजिक क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, यात कर्तुत्ववान कामगिरी करणाऱ्या नागरिकांचे प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन क्लब मार्फत सत्कार केले जातात. यावर्षी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत पहिल्यांदा पर्यावरण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या “मला बार नेचर कॉन्झर्वेशन क्लब आंबोलीच्या हेमंत ओगले आणि काका भिसे यांचा सत्कार करण्यात आला. आणि श्री.हेमंत ओगले याना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पार्थ भिसे, शुभम आळवे, सालवीन डिसोजा, राकेश देऊलकर, यांचे ही विविध क्षेत्रात प्रशंसनिय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दरवर्षी गुरुपौर्णिमा या दिवशी हे सत्कार केले जातात. परंतु यावेळी कोरोना आणि कडक नियम असल्यामुळे काही काळानंतर गुरुवारी सत्काराचा कार्यक्रम व्हिसलिंग वूड्स, आंबोली येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी “जागतिक व्याघ्र दिन” ही साजरा करण्यात आला. हा सत्काराच्या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, सचिव सुधीर नाईक, उपाध्यक्ष दिलीप म्हापसेकर, ज्येष्ठ सदस्य रो.रमेश भाट, रो.वसंत करंदीकर, रो.अॕड सिद्धार्थ भांबुरे, रो.प्रा.सचिन देशमुख, आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांनी संस्थेच्या पर्यावरण पूरक कामांना शुभेच्छा दिल्या व पर्यावरण संवर्धनासाठी ज्या-ज्यावेळी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी ची मदत लागेल त्या त्या वेळी ती करण्यात येईल असे आश्वासनही दिले. संस्थेच्या सदस्यांकडून रोटरी क्लब च्या सदस्यांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page