मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला धीरज परब यांनी दिली साद
*⚡कुडाळ दि.३०-:* चिपळूण मध्ये ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मध्ये चिपळूण महाड गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री बनी नाडकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मदतीचा ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना केला आहे. दरम्यान आज ५०० कुटुंबांना पुरेल एवढं कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली गेली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, हेमंत जाधव, गणेश वाईकर, सुबोधा परब, प्रथमेश धुरी आकाश नाईक सिद्धांत बांदेकर समीर वाळके सागर सावंत जगन्नाथ गावडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
