कळणे मायनिंग रद्द करण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार

ग्रामस्थांना खासदार विनायक राऊत यांनी दिले आश्वासन

*⚡दोडामार्ग दि.३० सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील मायनिंगच्या साठवलेल्या जलाशयाचा बांध तुटून काल झालेल्या नुकसानीची खा.विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करत स्थानिकांशी चर्चा केली. यावेळी नुकसान झालेल्या ग्रामस्थांनी खा.राऊत यांच्यासमोर नुकसानीचा वृत्तांत कथन करताना खासदार राउतही गहिवरले.यावेळी येथील नागरिकांनी कळणे मायनिंग कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी खा.राऊत यांच्याकडे केली.यावर खा.राऊत यांनी आपण तुमच्या मागे खंबीर असून मायनिंग रद्द करण्यासाठी येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

You cannot copy content of this page