नांदगाव आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झाली गर्दी

*⚡कणकवली दि.३०-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंध लसिकरणासाठी कोवॕक्सीनच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी नांदगाव व इतर १७ गावातून झुंबड उडालेली होती. अगदी पहाटे ४ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. आज कोवॕक्सिनचे एकूण १३० डोस आले होते. यासाठी आॕनलाईन पध्दतीने १३ जणांनी तर ११७ जणांनी आॕफलाईन नोंदणी केली होती. यामुळे लसींपेक्षा लाभार्थी जास्त झाल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले. नांदगाव परिसरातील तसेच इतर गावांवरून आलेल्या शेकडो नागरिकांची त्यामुळे निराशा झाली. प्रवास खर्चही वाया गेल्याने आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लसिकरण सुविधा सुरु केल्यास लोकांचा वेळ व पैसा ही वाचेल आणि लसिकरणासाठी प्रत्येक वेळी हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page