प्रदीप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनात जि.प.सदस्य सहभागी होणार

शिवसेना जि. प. गटनेते नागेंद्र परब यांचा इशारा

*⚡कुडाळ दि.३०-:* गेल्या चार वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्व निधी अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमध्ये सर्वच विरोधी पक्षातील सदस्यांवर अन्याय झालेला आहे. वेळोवेळी जिल्हा परिषद विभागातील नागरिकांकडून मागणी झालेल्या विकास कामांची मागणी जिल्हा परिषदकडे करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. व अतिशय चुकीच्या पद्धतीने मंजुरीच्या प्रक्रिया राबवून विकास कामे करण्यात आलेली आहेत. आणि ही सर्वच शिवसेना सदस्यांची भावना आहे. त्यामुळे २ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनात शिवसेना जिल्हा परिषद सदस्य व सदस्या सहभागी होणार आहेत, असा इशारा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे.

You cannot copy content of this page