राष्ट्रवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हा रुग्णालय येथे मास्क वाटप

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांचा पुढाकार

कणकवली 29 जुलै (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाम. अजितदादा पवार यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या पुढाकाराने जिल्हा राष्ट्रवादी महिला संघटनेच्यावतीने महिला जिल्हा अध्यक्षा सौ.रेवती राणे यांच्याहस्ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्णांसाठी व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, व इतर स्टाफ यांच्यासाठी एन 95 दर्जाचे मास्क जिल्हा शल्यचिकित्सक ड़ॉ श्रीपाद पाटिल व डॉ. श्याम पाटिल यांच्याकड़े सुपुर्द करण्यात आले त्यावेळी डॉ. श्रीपाद पाटिल यांनी मास्क वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला आकेरी माजी सरपंच संदीप राणे , जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. नीलम वर्णे , राष्ट्रवादी कणकवली महिला तालुका अध्यक्षा सौ. स्नेहल पाताडे ,माजी उपसभापती आर. के. सावंत, राष्ट्रवादी माजी जिल्हा ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे , कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, कणकवली राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन सदडेकर , विशाल ठाणेकर , शिवडाव उपसरपंच सतीश पाताडे, तनया देसाई व आरोग्य कर्मचारी बंड्या बिनसाले आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page