वैभवी पेडणेकर हिचा ‘सन्मान आपल्या कर्तुत्वाचा – घे भरारी’ जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान

मालवण दि.२९ पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महीला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने ” सन्मान आपल्या कर्तुत्वाचा – घे भरारी ” हा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन मसुरे गावची कन्या आणि कुडाळ हायस्कूल इयत्ता बारावी विज्ञान विभागात शिकणारी कुमारी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिचा ओरोस येथे नुकताच गौरव करण्यात आला. वैभवी हिने आजवर केलेल्या विविध क्षेत्रातील कार्याची आणि तिच्या अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांची दखल घेऊन वैभवीचा यावेळी सन्मान करण्यात आला. या वेळी समितीच्या अध्यक्ष सौ दीपा ताटे, सचिव सौ तन्वी सावंत व या समितीच्या सर्व सहकारी महिला उपस्थित होत्या. सन्मान आपल्या कर्तुत्वाचा – घे भरारी हा पुरस्कर प्राप्त झाल्या बद्दल वैभवी पेडणेकर हिने महीला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग या समितीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page