तोंडवली माजी सरपंच उमेश कुडतरकर भाजपात दाखल…

शिवसेनेला धक्का;आम. नितेश राणे यांनी केले स्वागत

*💫कणकवली दि२९-:* कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक आणि माजी सरपंच उमेश कुडतरकर व पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्या अंकीता कुडतरकर, समिर तावडे, निळकंठ कुडतरकर यांनी आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे .उमेश कुडतरकर हे शिवसेना नेते संदेश पारकर यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तोंडवली येथे खळबळ उडाली असून शिवसेनेला धक्का दिला आहे यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, सभापती मनोज रावराणे , भाजपचे तालूकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती दिलीप तळेकर,सरचिटणीस पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर,तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच अशोक बोभाटे , रविंद्र बोभाटे , दिनेश कांडर, अमित सदडेकर , योगेश सदडेकर , आनंद मोरजकर ,सचिन गावडे, सचिन गुरव प्रल्हाद कुडतरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page