बावशी रेशनिंग प्रश्नी उपोषण अखेर सोडले

*💫कणकवली दि.२८-:* बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाबाबत तहसिलदार आर .जे‌.पवार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व शासकीय नियम पाळून या विषयासाठी कमीटी स्थापन करण्यात येणार असून गावातील भौगोलिक परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले आहे. आंदोलन ठिकाणी काहींची प्रकृती खालावली होती यात बावशी शेळीची वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश रांबाडे यांना त्रास होवू लागल्याने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले होते. कणकवली तहसीलदार आर.जे.पवार, पुरवठा नायब तहसीलदार जिल्हा कार्यालय ,तालूका पुरवठा अधिकारी ममता तांबे, नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव, नांदगाव तलाठी सुर्दशन अलकुटे आदी शिष्टमंडळाने आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली करून लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे .यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनश्री कांडर, माजी सरपंच सुप्रिया रांबाडे, सुरेश रांबाडे,दिपक कांडर, हेमंत कांडर ,आबू मेस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page