सिंधुदुर्ग प्रमोटर नारायण कुंभार, नारायण आसयेकर, गौरव शिर्के, रोहित कुंभार, केतन कुमार यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
*💫बांदा,दि-२८-:* बांदा शहरात पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना ई-स्टोअर इंडियाने मदतीचा हात पुढे करत ई-स्टोअरचे सिंधुदुर्ग प्रमोटर नारायण कुंभार, नारायण आसयेकर, गौरव शिर्के, रोहित कुंभार, केतन कुमार यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या चार पाच दिवसांपूर्वी बांदा शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे अनेकांचे संसार उघडे पडले. त्यांना मदतीचा हात पुढे करत ई-स्टोअर इंडिया परिवारातर्फे येथील १६ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
