मालवण येथे १ रोजी राष्ट्रीय लोकअदालत

*💫मालवण दि.२७-:* मालवण येथील दिवाणी न्यायालयात १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी फौजदारीकडील प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे दाखल करून जास्तीत जास्त प्रकरणे मिटविण्यात यावीत. ही राष्ट्रीय लोकअदालत हे फिजिकल आणि व्हच्युअल अशा पद्धतीने घेतली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करून लोकन्यायालय पार पाडायचे आहे, असे आवाहन मालवण दिवाणी न्यायालयाने केले आहे.

You cannot copy content of this page