स्वच्छता पंधरावडा व कारगिल विजय दिन साजरा

*💫कणकवली दि२७-:* कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय ,भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग व महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या संयुक्त विदयमाने 15 जुलै ते 31 जुलै 2021 पर्यंत स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कामगार कल्याण सभागृह, कणकवली येथे स्वच्छता जनजागृती बाबत प्रतिज्ञा व वृक्षारोपण महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच आझादीका अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी कणकवली महाविद्यालय कणकवली चे प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण गावडे, जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे संचालक डॉ.मानसी चोरगे,महाराष्ट्र कामगार कल्याण व्यवस्थापक श्री.संतोष नेवरेकर ,जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे कार्यक्रम अधिकारी रमेश खरात, प्रशिक्षक सौ.शीतल मांजरेकर,साक्षी दळवी,नाईक मॅडम,धनंजय सावंत इ. मान्यवर उपस्थित होते. जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग च्या संचालिका डॉ.मानसी चोरगे यांनी प्रास्ताविकातून जन शिक्षण संस्थांनच्या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत व 15जुलै ते 31 जुलै 2021 या स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाबाबत माहिती दिली.तसेच वृक्षारोपण या विषयाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याणचे व्यवस्थापक संतोष नेवरेकर यांनी कामगार कल्याण बऱ्याच योजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणें त्यांनी कामगारांच्या मुलांना 10वी,ते पदवी पर्यंतच्या शिष्यवृत्ती बाबत माहिती दिली.जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे सहा.कार्यक्रम अधिकारी रमेश खरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आझादीका अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत कारगिल विजय दिना संदर्भात मार्गदर्शन केले. सौ.शीतल मांजरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page