सर्पमित्र नाथा केरकर यांनी सापाला जीवदान देऊन अज्ञातस्थळी सोडले
*💫वेंगुर्ले दि.२६-:* शिरोड्यात सात फुटी कोब्रा जातीच्या सापाला जीवदान देऊन अज्ञातस्थळी सोडण्यात आले आहे.शिरोडा मोरजकरवाडी येथील विकास सारंग यांच्या राहत्या घरात अति विषारी कोब्रा जातीचा साप आढळून आला. विकास सारंग यांच्या घरी गावठी कोंबड्या असल्याने तो साप कोंबडीची अंडी किंवा पिल्ले खाण्याच्या उद्देशाने आला असावा. तो साप घरात घुसतांना त्यांच्या पत्नीला दिसला त्याक्षणी तिने आरडाओरड केली असता तो घरामध्ये शिरला त्यानंतर मोठी तारांबळ उडाली होती. वेंगुर्ला उभादांडा येथील सर्पमित्र नाथा वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावण्यात आले त्यांनी त्या सापाला पकडून निर्मनुष्य स्थळी अज्ञातवासात सोडून दिल्याने त्या अति विषारी सापाला जीवदान दिले आहे. अति विषारी कोब्रा जातीचा फना धारी साप मोरजकरवाडी येथील विकास सारंग यांच्या घरात घुसल्याचे समजतात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. परंतु तो अति विषारी साप फना काढून असल्याने त्याला पकडण्याची कोणाचीही हिंमत होत नसल्याने शेवटी सर्पमित्र नाथा केरकर यांना बोलावून त्या सापाला अज्ञात स्थळी सोडून दिले त्यामुळे सारंग कुटुंबांनी नाथा केळकर यांचे आभार मानून भयमुक्त झाले.
