हळवल गावात कृषी सहाय्यकांनी केली पाहणी

शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश मिळण्याची प्रतिक्षाच

*💫कणकवली दि२६-:* मागील काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात कणकवली तालुक्यातील हळवल परबवाडी येथील शेतीच्या भागात गडनदीचे पाणी घुसल्याने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत तालुका कृषी सहाय्यक प्राची सावंत यांनी पाहणी केली. यावेळी हळवल सरपंच दिपक गुरव, हळवल गावातील नुकसानग्रस्त शेतकरी सुभाष परब, अनिल परब, वामन परब, दिनकर परब, कैलास परब, राजेंद्र काळसेकर, राहुल परब, विराज परब आदी उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या परिसरातील शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप मिळाले नसल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे. लवकरात लवकर कणकवली तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. हळवल परबवाडी येथील सुमारे ७ ते ८ हेक्टर क्षेत्र हे नुकसानग्रस्त असून सुमारे ४० ते ४५ शेतकऱयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांना नुकसान योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हळवल सरपंच दिपक गुरव यांनी केली आहे.

You cannot copy content of this page