सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख
आंबोली,ता.२६: येथील पावसाने द्विशतक गाठले असून आतापर्यंत २०४ इंच (५१००मिलिमीटर) पावसाची नोंद आंबोलीत झाली आहे. जगात सर्वाधिक पाऊस मेघालयात मॉसिंराम त्यानंतर भारतात ईशान्य कडे चेरापुंजी त्यानंतर कर्नाटक येथील आगुंबे येथे त्यानंतर महाराष्ट्रात दक्षिणेकडे सह्याद्रीच्या सर्वात उंच पर्वत रांगेत असणाऱ्या आंबोलीत सर्वाधिक पाऊस होतो.राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मॉसिंराम आणि चेरापुंजी येथे २ वर्षे पाऊस कमी झाला होता त्यामुळे आंबोली पावसाने विश्व विक्रम केला होता.त्याठिकाणी ६ महिने पाऊस पडतो. तर कोकणात साधारण ५ महिने पाऊस पडतो. या वर्षी मे महिन्यात पाऊस पडला.मात्र मोजला नाही कारण १ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत पाऊस मोजला जातो.गेल्यावर्षी इतक्यात श्रावण महिना सुरू झाला होता.या वर्षी आतापर्यंत २०४ इंच इतका पाऊस झाला आहे.काल पासून आजपर्यंत १५४ मी.मी ( साधारण६ इंच) पावसाची नोंद झाली आहे.तरी २९ रोजी अधिक पावसाची शक्यता आहे असे भाऊ ओगले म्हणाले. पावसाने आपली सरासरी भरून काढली आहे.त्यामुळे यावर्षीही ३५० इंचाच्या पुढे पाउस पडणार आहे.
