मालवण येथील 100 इडियड्स व्हाट्सॲप ग्रुपचा असाही आदर्श

चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन टेम्पो जीवनावश्यक साहित्य पाठविले

*💫मालवण दि.२५-:* गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेऊन मदातकार्यात अग्रेसर असणाऱ्या मालवण येथील 100 इडियड्स या व्हाट्सएप ग्रुपने पुन्हा एकदा आपल्या सेवकार्यातून आदर्श निर्माण केला आहे. चिपळूण येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन टेम्पो भरून जीवनावश्यक साहित्य शनिवारी रात्री रवाना करण्यात आले. चिपळूण येथे निर्माण झालेल्या विध्वंसक पूरस्थिती नंतर अनेकांचे घर, संसार, दुकाने उध्वस्त झाले. येथील नागरिकांना आपणही आपल्या परीने मदतीचा हात द्यावा या हेतूने मालवण येथील 100 इडियड्स या व्हाट्सएप ग्रुपचे ऍडमिन सिजर डिसोजा यांनी ग्रुप सदस्यांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रुप सदस्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. अनेक हात एकत्र आले आणि एका दिवसात लाखाचा टप्पा पार झाला. त्या सोबत कोणी तांदूळ, पाणी वगरे जीवनावश्यक साहित्यही दिले. जमा झालेले पैसे एकत्रित करून जीवनावश्यक अन्ननध, साहित्य व कपडे खरेदी करून चिपळूण येथे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून ज्या ठिकाणी अतिशय तातडीची गरज आहे अश्या भागातील पूरग्रस्त गरजू नागरिकांपर्यंत मदत नेण्याचे निश्चित झाले. गोष्ट कोकणची या युट्युब चॅनेलच्या वतीने हळकुळ येथील तरुण व शेतकरी यांच्या वतीने गोळा करण्यात आलेली मदतही 100 इडियड्स ग्रुपकडे सुपूर्द करण्यात आली. शनिवारी रात्री मालवण देऊळवाडा नारायण मंदिर येथे प्रातिनिधिक स्वरूपात ग्रुप सदस्य एकत्र आले. ग्राम देवता श्री देव नारायण, रामेश्वर चरणी प्रार्थना करून ग्रुप सदस्य अमोल गोलतकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मदत गाड्या रवाना झाल्या. कै. केदार गांवकर, कै. प्रमोद (बाळू) गोसावी, कै. निलेश केळुसकर (ढोमसो), कै. महेश गिरकर (डुबा) कै. मोहन रेडकर या मालवण शहरात कायम समाजकारण मध्ये सक्रिय असलेल्या आमच्या मित्रांच्या स्मरणार्थ मदतकार्य रवाना करत असल्याचे ग्रुप ऍडमिन सिजर डिसोजा व सदस्य यांच्या वतीने सांगण्यात आले.

You cannot copy content of this page