प्रोत्साहनपर बळ देण्यासाठी स्व. डॉ. दिवाकर मराठे चॅरीटेबल ट्रस्टचा पुढाकार
*💫कणकवली दि२५-:* कणकवली रोटरी क्लब कणकवलीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोविड योध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला . विशेषतः शासकीय यंत्रणेतील डॉक्टर्स , नर्सस व अन्य सामान्य कर्मचारी वर्ग कोविड संदर्भात करत असलेल्या कार्याची नोंद रोटरी क्लब कणकवलीने घेऊन त्यांना प्रोत्साहनपर बळ देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आयोजित केला होता . हा कार्यक्रम रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ . विद्याधर तायशेटे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ . बाळकृष्ण म्हाडेश्वर , वैद्यकीय अधीक्षक डॉ . सी. एम. शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . स्व. डॉ. दिवाकर मराठे चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाबाबत रोटरी क्लबची भूमिका स्पष्ट करताना प्रेसिडेंट डॉ. विद्याधर तायशेटे म्हणाले. रोटरी नेहमीच अशा व्यक्तींच्या पाठीशी आहे . जे जे लोक अशा संकटकालीन काळात आपला जीव धोक्यात घालून काम करतात त्याच्या कार्याची नोंद समाजाने घेतलीच पाहिजे . समाजाने आपल्या कामाची नोंद घेतली याची त्यांना जाणीव व्हावी म्हणून अशा समारंभाचे महत्त्व असते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रेझरर रविंद्र मुसळे यांनी केले .या कार्यक्रमासाठी डॉ. अमेय मराठे यांनी सहकार्य केल्याचेही नमूद केले.प्रमुख अतिथी डॉ .म्हाडेश्वर यांनी डॉ . दिवाकर मराठे यांच्या स्मृती जागवताना काही आठवणी सांगितल्या . या कार्यक्रमात उपजिल्हारुग्णालय कणकवली यर्थ कोविडसाठी काम करणारे सर्व डॉक्टर्स व ४ परिचारीकासह अन्य कर्मचारी वर्गाचा प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला . उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथील कोविड कक्षाची गरज विचारात घेऊन रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी प्रेसिडेंट डॉ . विद्याधर तायशेटे यांनी हॉट अड कॉल्ड वॉटर डिसपेनसर विथ फ्रीज मशिन वैद्यकीय अधीक्षक डॉ . शिकलगार यांचेकडे सुपूर्द केला .या कार्यक्रमास रोटरी क्लबचे दिपक बेलवलकर , एविझ . सेक्रेटरी अॅड . राजेंद्र रावराणे , दादा कुडतरकर , रमेश मालवीय , सौ . सुंदर मालवीय , दिपक अंधारी , नितिन बांदेकर , संतोष कांबळे ,स्व . डॉ . दिवाकर मराठे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अमेय मराठे , भेराराम राठोड आदी मेम्बर्स उपस्थित होते .
