हरियाणा येथील चालक ताब्यात;उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
*💫बांदा दि.२४-:* गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने ट्रकमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत तब्बल ३२ लाख ४० हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. ६०० बॉक्समध्ये तब्बल ७२०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी हरियाणा येथील चालकास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई इन्सुली तपासणी नाका तसेच रत्नागिरी व कोल्हापूरच्या पथकाने संयुक्त विद्यमाने आज कारवाई केली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ एच. बी. तडवी यांच्या आदेशानुसार इन्सुली तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए. ए. पाडाळकर, एस. एस. काळे, पी. वाय. पाटील, जवान आर. डी. चंदूरे, सकपाळ, कांबळे, एस. एम. कदम यांनी केली. अधिक तपास एस. एच. चव्हाण करीत आहेत.
