*💫मालवण दि.२४-:* वायमॅक्स स्पोर्ट आयोजित पिकालबॉल महा इंटर क्लब स्पर्धा पार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ अग्रगण्य क्लब च्या संघांनी भाग घेतला होता अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या संघाने जळगाव संघाचा ४- १ एवढया ने पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. याच बरोबर पहिल्यांदाच आयोजित झालेल्या महिलांच्या सांघिक सामन्यात टीम फ्युजन गर्ल च्या संघाने बाजी मारली. या स्पर्धेचे उद्घाटन वाकोला परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती(रजि.) संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुला चे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सचिव डॉ.मोहन अ. राणे यांच्या उपस्थितीत पार पडली या स्पर्धेत महिलांच्या गटात अनन्या पाटील आणि वृषाली ठाकरे यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद खेचून आणले. पुरुषांच्या सामन्यामध्ये विशेष चुरस दिसून आली. पिकलबॉल सारख्या वैयक्तिक खेळामध्ये भारतात पहिल्यांदाच IFP AIPA आणि APFI मान्यताप्राप्त सांघिक क्लब स्पर्धा एवढ्या मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे यजमानपद यंदा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने भूषविले आणि कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत सदर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी भारतीय पिकल बॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.अरविंद रमेश प्रभू यांचे विशेष पाठबळ आणि मार्गदर्शन लाभले. पिकलबॉल खेळ तुलनेने नवीन असूनही दिवसेंदिवस या खेळाची लोकप्रियता वाढत आहे आणि म्हणूनच वायमॅक स्पोर्ट्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून अतिशय माफक दरात पिकलबॉल खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाय मॅक स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री. मकरंद येडूरकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यशोधन देशमुख निखिल मथुरे, अभिजित शिंदे, अमोल जोगळे, ऋषभ राऊत, राहुल घाणेकर, अभिषेक सावंत यांनी मेहनत घेतली.
पिकलबॉल महा इंटर क्लब स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे संकुल संघ विजेता
