*💫मालवण दि.२४-:* रत्नागिरी मध्ये चिपळूण व इतर काही भागात आलेल्या पूरस्थितीमुळे पूरग्रस्त भागातील नागरिक हतबल झाले या नागरिकांसाठी असून या नागरिकांना कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँग्रेसतर्फे मदत करण्यात येणार असून या मदतकार्यात सर्वांनी सहकार्य करावे यासाठी सहकार्य दौरा काढण्यात येणार आहे. यामध्ये इच्छुकांनी जमेल ती मदत वस्तू रुपात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चिपळूण व इतर परिसरात आलेल्या पूरस्थितीमधील नुकसानग्रस्तांना युवक काँग्रेस तर्फे मदत करण्यात येणार आहे. या मदत कार्यात इतरांनीही सहकार्याचा थोडा भार उचलावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना धान्य, पाणी बॉटल्स बॉक्स, मेणबत्ती, साबण, पावडर, बिस्किट, फरसाण, झाडू आशा गृहोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंची आज नितांत गरज आहे. अशा स्वरूपाच्या वस्तू इच्छुकांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे रविवार दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत जमा करावी. यासाठी कुडाळ- मालवण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मंदार शिरसाट – 9075644699, उपाध्यक्षा पल्लवी विजय तारी- 9420051820, कुडाळ शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर- 9049933439, मालवण शहराध्यक्ष गणेश पाडगावकर- 9423214745, मालवण तालुकाध्यक्ष अमृत राऊळ- 8459384557 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कुडाळ – मालवण युवक काँग्रेसच्या माध्यमातून सहकार्य दौरा
