मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या करियर गायडन्स व प्लेसमेंट सेल तसेच द युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार आयोजित केले असून त्यामध्ये MPSC-UPSC/SSC/IBPS यासह इतरही सर्व ‘स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी’ या विषयांवर ऑनलाईन माध्यमाद्वारे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. या वेबिनार मध्ये ‘द युनिक अकॅडमी, पुणे येथील प्राध्यापक इंद्रजीत यादव व मयूरी सावंत हे मार्गदर्शन करणार असून स्पर्धा परीक्षासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरेही तज्ज्ञ मार्गदर्शक देणार आहेत. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी Google Form : https://forms.gle/N5uVKQ6Qo7PYK8348 भरावा. तसेच टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी Telegram Channel : https://t.me/joinchat/-mbPZ6PN5fRkN2U1 या लिंकवर क्लिक करावे. तर अधिक माहिती साठी चंद्रकांत खराटे, द युनिक अकॅडमी पुणे (9823683344), डॉ.सुमेधा नाईक -समन्वयक, करियर गायडन्स व प्लेसमेंट- 9404924678 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी केले आहे.
स्पर्धा परिक्षांबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन
