पूरग्रस्तांना शासनाचे निकष बाजूला ठेऊन भरघोस मदत द्या

कोकण विकास आघाडीचे मोहन केळुसकर यांची मागणी

*💫कणकवली दि२४-:* पुरग्रस्तांना शासनाचे प्रचलित नुकसान भरपाईचे निकष बाजूला ठेऊन भरघोस आर्थिक मदत करा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.नद्यांतील गाळ काढून नद्यांची पात्रे खोल आणि रुंद करा. तसेच विकासाच्या नावाखाली चाललेली अनियंत्रित आणि बेकायदेशीर विकास कामे रोखा, अशी मागणीही केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. चिपळूण, महाड, राजापूर आदी नद्या किनारी असलेल्या सखल भागातील शहरांचे उंच भागात पुनर्वसन करा, अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. प्रा. एन. डी. पाटील यांच्या समवेत २० वर्षांपूर्वी या शहरांतील प्रतिष्ठित, जाणकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन त्यांना संभाव्य धोक्याची कल्पना दिली होती, अशी माहिती देऊन केळुसकर म्हणतात, त्यावेळी व्यापारीवर्गं आमचे ऐकायला तयार झाला नाही. शासनाने राजापूरवासिय व्यापाऱ्यांना सद्याच्या बस स्थानकाच्यानजीक पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध करून दिली होती. पण व्यापारी ऐकायला तयार झाले नाहीत. चिपळूण, महाड शहरांसाठी पर्याय ठेवण्यात आले होते. हे पर्याय त्यांनी स्वीकारले असते तर आताचे कधीही भरून न येणारे अब्जावधी रुपयांचे नुकसान टळले असते. अतिवृष्टीमुळे वारंवार ओढवणाऱ्या पुरपरिस्थितीचा आम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. गेल्या अनेक वर्षांत नदीनाले, खाडीपात्रे यामध्ये गाळ जमा झाला आहे. परिणामी पात्रे उथळ झाली आहेत. विकासकांनी पूररेषेचा विचार न करता अनियंत्रित, बेकायदेशीर बांधकामे केली जआहेत. शहरातील पाण्याचा होणारा नैसर्गिकरित्या उसपा रोखला आहे. परिणामी महापुराचे पाणी शहरातील सखल भागात घुसते. त्यात प्रामुख्याने गरीब जनता भरडली जाते. म्हणून आम्ही गेली अनेक वर्षें शासन दरबारी कोकणातील नदीनाल्यांचा, खाडीपात्रांतील गाळ काढा, पात्रांची रुंदी वाढवा,अशी मागणी सातत्याने निवेदनाद्धारे करीत आहोत, अशी माहिती देऊन केळुसकर म्हणाले, दरड कोसळून आणि भुरसख्यलानामुळे जमीनदोस्त झालेल्यांची कच्ची घरे पाहिल्यास यामध्ये म्रुत्युमूखी झालेले गरीब लोक आहेत. या आपत्तीतून वाचलेल्याचे पुनर्वसन योग्य प्रकारे झाले पाहिजे. कोरोनाच्या महामारीमुळे कर्जाच्या विळख्यात असलेल्या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे आर्थिक पुनर्वसन करताना शासनाने आपली झोळी सैल सोडली पाहिजे. अनियंत्रित विकास कामे रोखली पाहिजेत.असे मोहनराव केळुस्कर म्हणाले.

You cannot copy content of this page