राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांदा येथील नुकसानीची केली पाहणी

नुकसानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार असल्याची दिली माहिती

*💫बांदा दि.२४-:* बांदा बाजारपेठेत मुसळधार पावसाच्या थैमानामुळे हाहाकार माजला होता. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाच मोठ नुकसान झाल आहे. घरादारात पाणी शिरल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल होते. आज सायंकाळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांदा येथील नुकसानीची पहाणी केली. गणेश चित्रशाळा, नुकसानग्रस्त घरांना भेट दिली. तर या आपत्तीत‌ येथील शेतकऱ्यांचा तीन गायी मृत पावल्या त्या कुटुंबियांची भेट घेत आधार दिला. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, संतोष जोईल, इफ्तिकार राजगुरू, बांदा ग्रामस्थ उपस्थित होते. या नुकसानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page