लाईनमन सुनिल उर्फ पिंटया इंदप यानी बजावले कर्तव्य
कणकवली 24 जुलै नांदगाव येथील महावितरणचे लाईनमन सुनिल उर्फ पिंटया इंदप यानी वीज खांबाजवळ कंबरेपर्यंत पाणी असतानाही पोलवर चढून वीजपुरवठा सुरू केला.आणि कोळोशी परीसरातील विजपुरवठा सुरळीत करीत कोळोशी गाव प्रकाशमय केला. यामुळे श्री. इंदप याच्या कामाबद्दल कौतुक होत आहे. नांदगाव परीसरात दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर सर्वच परीसरातील पाणी साचले आहे.याचदरम्यान अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरीकही हैराण झाले आहेत. यातच नांदगाव महावितरणचे कर्मचारी भर पावसात काम करीत असून ज्या ठीकाणी पाणी साचले आहे अशा ठिकाणी जात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. कोळोशी परीसरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानतंर वायरमन सुनिल इंदप यानी आपला जीव धोक्यात घालून कंबरेपर्यंत असणाऱ्या पाण्यातून जात विद्युत पोलावर चढून वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न केले.
