तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बीएसएनएल कार्यालयाला भेट देत केली चर्चा
*💫सावंतवाडी दि.२३-:* मुसळधार पावसामुळे बीएसएनएलचा नेटवर्कचा पुरता फज्जा उडाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बीएसएनएलच्या कार्यालयाला भेट देत विचारपूस करत चर्चा केली. यावेळी बीएसएनएलचे उप महाप्रबंधक श्री. देशमुख यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागात पावसामुळे काम करण्यास अडथळे निर्माण होत असल्याने नेटवर्करला प्रॉब्लेम आहे. जिल्ह्यात कोणतीही अडचण नसून उद्यापर्यंत नेटवर्क पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती दिली. यावेळी उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, संतोष जोईल आदी उपस्थित होते.
