*पुराच्या पाण्याबरोबर वाहून आल्याचा व्यक्त होत आहे अंदाज : अधिक तपास सुरू*
मालवण दि प्रतिनिधी मालवण तळाशील समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी कुजलेल्या स्थितीतील एक मृतदेह दिसून आला आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक मच्छीमार संजय तारी यांनी मालवण पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे. या मृतदेहाचे लचके भटके कुत्रे तोडत असल्याचे मच्छीमारांना दिसून आले. त्यानंतर कुत्र्यांना तेथून हाकलून लावत पोलिसांना माहिती देण्यात आली.
