दिगवळे रांजणवाडी रस्त्यावरील माती हटविली

माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांचा पुढाकार

*💫कणकवली दि.२३-:* कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी रस्ता पूर्ववत करण्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ (गोट्या) सावंत यांनी स्वखर्चने जेसीबीच्याच्या साहायाने रस्तावरील मातीचे ढिगारे बाजूला करण्याचे काम केले. पहाटे डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणात माती दिगवळे रांजणवाडी रस्त्यावर येऊन रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती तसेच पूर्णतः रांजणवाडी येथील जनजीवन विस्कळीत होत वीज पुरवठाही खंडित झाला होता पण हे सर्व सुरळीत करण्यासाठी व वाहतुक सुरू होण्यासाठी गोट्या सावंत यांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबी लावून रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. यावेळी हरी परब,राजू पवार,सरपंच उपसरपंच, हे उपस्थित होते

You cannot copy content of this page