नद्यांनी धारण केले रौद्ररूप तर जनजीवन विस्कळीत
वैभववाडी प्रतिनिधी : कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजविला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. अरुणा मध्यम पाटंबधारे प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी धरणातील उंबरठा पातळी १५९.५० मी. पेक्षा पाणी पातळी जास्त झाल्यानंतर पुढील दोन दिवसांच्या आत धरणातून पाणी सांडव्यावरून वाहणार आहे. त्यामुळे नदी पात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होणार आहे. तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदी पात्रात येवून नदी पात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांनी नदी पात्रात उतरू नये असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय कार्यकारी अभियंता अंबडपाल यांनी निवेदनाव्दारे केले आहे.
